प्रकल्प
स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती भवन
निगडी प्राधिकरण येथे ४४ गुंठे भूखंडावर उभारलेले १.५ लाख चौ. फूट भव्य स्मारक.
उद्देश
औद्योगिक नगरीत महाराष्ट्राच्या शिल्पकाराचे स्मारक
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या औद्योगिक धोरणांमुळेच पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक नगरी उभ्या राहिल्या. त्यांच्या कार्याची प्रेरणा भावी पिढीतील युवकांना मिळावी म्हणून त्यांचे स्मारक याच नगरीत असावे, या भावनेतून हा प्रकल्प उभा राहिला.
या स्मृती भवनामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पडली असून महाराष्ट्रातील जनतेला व भावी पिढीतील युवकांना हे स्मृतीभवन निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

प्रवास
संकल्प ते साकार
-
१९८९
समितीची स्थापना
यशवंतप्रेमींनी एकत्र येऊन मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वये समिती स्थापन केली.
-
१९९१
भूखंड प्राप्त
प्राधिकरण, निगडी येथे स्मारक उभारण्यासाठी ४४ गुंठे भूखंड घेतला.
-
२०१४
बांधकामास सुरुवात
भव्य स्मृती भवनाच्या बांधकामाची सुरुवात झाली.
-
२०२६
बांधकाम पूर्ण
सप्टेंबर २०२६ मध्ये १.५ लाख चौ. फूट बांधकाम पूर्ण.
निधीअभावी काम पूर्ण होण्यास थोडा विलंब झाला, मात्र सप्टेंबर २०२६ मध्ये संपूर्ण बांधकाम पूर्ण झाले.
सोयी-सुविधा
स्मृती भवनमध्ये काय आहे?

स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा
भारतातील सर्वांत उंच (१५ फूट) पुतळा.
अधिक माहिती →
स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व ग्रंथालय
स्व. अरुण किर्लोस्कर अभ्यासिका - UPSC / MPSC विद्यार्थ्यांसाठी.
अधिक माहिती →
इतिहासाचे ग्रंथालय व वाचनालय
स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले इतिहास ग्रंथालय.
अधिक माहिती →
विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र
स्व. हिराबाई किसनराव लांडगे केंद्र - शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी.
अधिक माहिती →
विद्यार्थी वसतिगृह
५२ खोल्या, १४४ विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी.
अधिक माहिती →
यशवंतराव चव्हाण जीवनपट दालन
संपूर्ण जीवनपट चित्र दालनाच्या स्वरूपात - महाराष्ट्रात फक्त येथे.
अधिक माहिती →
पश्चिम महाराष्ट्र वधू-वर सूचक केंद्र
सर्व जाती-धर्मातील विवाहेच्छुक वधू-वरांसाठी.
अधिक माहिती →
स्व. वेणुताई चव्हाण बहुउद्देशीय सभागृह
१२०० व ३५० आसन क्षमतेची वातानुकूलित सभागृहे.
अधिक माहिती →
पाहुण्यांच्या निवासासाठी खोल्या
८ वातानुकूलित (A/C) खोल्या उपलब्ध.
अधिक माहिती →
स्व. आ. लक्ष्मणभाऊ जगताप अर्धाकृती पुतळा
स्मृती भवन उभारणीतील मोलाच्या योगदानाचे स्मरण.
अधिक माहिती →पत्ता
स्मृती भवनला कसे पोहोचाल?
स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती भवनसेक्टर नं. २७ अ, संत तुकाराम उद्यानाशेजारी, प्राधिकरण, निगडी, पुणे - ४११ ०४४
संत तुकाराम उद्यानाशेजारी, निगडी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड.